पुढची पायरी ही लेखमाला लिहिताना अमुक एक असा आराखडा काही मनात नव्हता. उद्योग क्षेत्रात अगदी खालच्या स्तरापासून ते उद्योग प्रमुख म्हणजे बिझीनेस हेड ह्या पदांपर्यंतच्या प्रवासात जे मला अनुभव आले, काही सहका-याचे तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ सहका-याचे अनुभव दृष्टीस पडले त्यानुसार या लेखमालेतला एकेक विषय डोळ्यासमोर येऊन गेला आणि तोच मांडायचा प्रयत्न केला आहे.
वर्तमान पत्रात लिहिताना नेहमी शब्दांचे बंधन असते . तुमच्या संपादकांनी सांगितलेल्या चौकटीतच तुम्हाला लिहायला लागते. त्यामुळे तुम्हाला एखाद्या विषयावर सखोल लिहावेसे वाटले तरी विस्तारभयास्तव लिहिता येत . नाही.
परंतु ब्लॉगवर लिहिताना लांबीचे बंधन नाही त्यामुळे जे मी वर्तमानपत्रात जागेअभावी लिहू शकलो नाही; ते पण मी काही लेखात येथे अनुस्यूत केले आहे.
पुढची पायरी या लेखमालेची अनुक्रमणिका खालील प्रमाणे आहे
१. ऑफिस प्रवेशाची उत्कंठा
२. शिकण्याचे कौशल्य
३. विचारमंथनाची कसोटी
४.ऑफिसमधील संवादकौशल्य
५. कामाची गुणवत्ता
६. तणाव मुक्त काम
७. कार्यालयातील कुहू कुहू
८. रजा कशी घेऊ?
९. कठीण समय येता…
१०. कार्यालयातील कुचाळक्या
११. कार्यालयीन राजकारण
१२. बदलाचे व्यवस्थापन
१३. वेळेच्या व्यवस्थापनाची जादू
१४. स्वतःचा ब्रँड बनवताना
१५. कार्यालयीन वेळे बाहेरचे काम
१६. जबाबदारी जाणा
१७. कामा पलीकडचे कार्यक्रम
१८. ऑनलाइन व्यसने
१९. कार्यालयातील मैत्री
२०. कंपनीच्या मालमत्तेचे रक्षण
२१. अष्टावधानी बना
२२. कार्य आणि आयुष्याचा समतोल
२३. वार्षिक मूल्यमापनाची तयारी
२४. नोकरी सोडताना
तेव्हा वाचनाचा आनंद घ्या, वाचता वाचता चिंतन करा आणि काही शंका असतील किंवा प्रतिसाद द्यायचा असेल तर मला jayantpanse.blog@gmail.com ह्या ईमेल वर मला अवश्य लिहा.
मीही लवकरात लवकर प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतो